By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येला रवाना झाले आहेत. हे सर्वजण रामजन्मभूमीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. दरम्यान, या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत अयोध्येत पोहोचलते. दुसरीकडे अयोध्येत दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे अयोध्येत हालअलर्ट जारी करण्यात आलाय. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासह व्हीआयपी दौऱ्यांमुळे अयोध्येतील सुरक्षाव्यव्यस्थेत आणखी वाढ करण्यात आलीय.
दरम्यान, आज महाराष्ट्रात फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. आज सकाळी ११ वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, उद्धव यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्तारातील नावे अंतिम झाली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळ....
अधिक वाचा