By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
धारावीतल्या लोकांना चावणारा डास मातोश्रीवर येऊन मलाही चावतो, त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे विधान धारावीच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावर काँग्रेसने शिवसेनेवर शालजोडीतून टीकास्त्र सोडले.
या आधी मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता, आम्ही अल्पज्ञ वृथा मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो, परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने डासांची पैदावार वाढविण्यासाठी शिवसेना कार्यरत होती, हे आम्हाला आत्ता समजले. त्यामुळे उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही, याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे. याकरिता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढविण्यासाठी नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर अगरबत्तीसह विविध उत्पादने वापरून डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल, याकडे जनतेचा प्रयत्न असायचा, परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो, हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावनासारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी, परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे. एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधुभावाचे नाते तयार होते, असे उद्धवजींनी आपल्याला सांगितले आहे. हा वैश्विक विचार आहे, असा टोला ही त्यांनी लगावला.
बॉलिवूड अभिनेता सनी देओल भाजपामध्ये दाखल झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, सन....
अधिक वाचा