ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"औरंगजेब सेक्युलर नव्हता, म्हणून औरंगजेब सेक्युलर एजेंड्यात येत नाही" - उद्धव ठाकरे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 09, 2021 09:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : नाशिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची हिंदुत्वाशी नाड कायम असल्याचं, तसेच तीन पक्ष एकत्र येताना जो एजंडा आहे, त्यात सेक्यूलर शब्द असला, तरी सेक्यूलर व्यक्तींसाठीच असल्याचं स्पष्ट केलं आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर तुम्ही का करता, या प्रश्नाचं उत्तर देताना दाखवून दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्ववीटरवर आणि डीजीआयपीआरकडूनही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला जात आहे, याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये प्रश्न विचारण्यात आला.

कारण औरंगजेब काही सेक्युलर नव्हता - उद्धव ठाकरे

या प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता चोख उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरादाखल म्हटलं आहे, "यात नवीन मी काय केले आहे, नवीन काय केलं आहे मी, जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे, जे शिवसेनाप्रमुख बोलत आले होते, आणि तेच मी करणार आहे. एक गोष्ट अशी आहे, औरंगजेब सेक्युलर नव्हता, आमच्या एजेंड्यात सेक्युलर हा जो शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही."

बाळासाहेब थोरातांच्या आक्षेपाला उत्तर

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने  नाराजी व्यक्त केली होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी ही नाराजी व्यक्त करताना म्हटलं होतं, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा, यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

शहरांचं नामांतरण किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही- बाळासाहेब थोरात

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अशा शब्दात ही नाराजी व्यक्त केली आहे.

मागे

Maratha Reservation : 'अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही', बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावल
Maratha Reservation : 'अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही', बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावल

मराठा उपसमितीवरुन अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, अशा शब्द....

अधिक वाचा

पुढे  

नितेश राणेंचा एकाला 12 कोटींचा गंडा, फडणवीस तुरुंगात टाकणार होते; राऊतांचा दावा
नितेश राणेंचा एकाला 12 कोटींचा गंडा, फडणवीस तुरुंगात टाकणार होते; राऊतांचा दावा

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्याव अत्यंत गं....

Read more