By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकत्रितपणे प्रचार केला जात होता. तर, युती करतानाच शिवसेनेचा योग्य सन्मान राखला जाईल, याची व्यवस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे युतीपूर्व काळातही शिवसेनेच्या कोणत्याही टीकेला प्रत्युत्तर न देण्याचे आदेशच मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नेत्यांना दिले होते. तर, उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात लावण्यात आलेला फलक हा दोन्ही पक्षांमधील वादाचे कारण ठरलाय.. प्रचारासाठी लावण्यात आलेल्या या फलकावर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव नव्हते. त्यामुळे युवासेनेचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. याचा निषेध करण्यासाठी वांद्रे येथे तातडीने युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकी सुध्दा झाल्या.
आदित्य ठाकरे यांचा योग्य सन्मान होईपर्यंत पुनम महाजन यांच्या प्रचारात न उतरण्याचा निर्णय युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. माञ, याचा फटका पुनम महाजन यांना बसू शकतो. त्यामुळे कोणताही दगाफटका टाळण्यासाठी पुनम मातोश्रीवर जाणार असल्याचे कळते.
मतदानापूर्वी ४८ तास समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या पेड राजकीय ज....
अधिक वाचा