ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आमच नक्की ठरलय ? पण काय ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आमच नक्की ठरलय ? पण काय ?

शहर : मुंबई

"लोकसभेच्या वेळीच विधानसभा निवडणूकाचा फॉर्म्युला ठरलाय", अस उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना  भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुका घोषित होण्याला आता काही घटकाच शिल्लक राहिले आहेत. कारण लवकरच निवडणूक आयोगातर्फे निवडणुका घोषित केल्या जातील असे सांगितले जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आजची पत्रकार परिषद महत्वाची ठरते.

मात्र आज  उद्धव ठाकरे यांचे विधान विशेष वाटत नाही कारण लोकसभेपासून शिवसेनेकडून हेच सांगितले जात आहे.

त्यावर काही नेते मंडळींनी उलटसुलट प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातच पुढे बोलताना "अजून चर्चा अंतिम टप्प्यात चालू आहे. युती होईलच अशी परिस्थिति आहे. मात्र सन्मानजनक जागा मिळाल्यास त्यावर शिक्कामोर्तब होईल" अस म्हटल्याने युती बाबतचा गोंधळ कायम आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी "अजून फॉर्म्युला ठरलेला नाही" अस म्हणून उद्धव ठाकरे यांच्या विधांनाला फाटा दिला आहे. आणि पुढे उद्धव ठाकरे आणि फडणवीस काय ते ठरवतील युती होईलच. अस म्हणून पुन्हा गोंधळ सदृश विधान केले आहे. त्यामुळे युती करण्यासाठी दोन्ही पक्ष तयार आहेत. मात्र शिवसेना सन्मान जनक जागांसाठी थांबली असल्याचे दिसून येते.

शिवसेना-भाजपमध्ये 126-162 जागांचा फॉर्मुला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आजची बैठक बोलावली होती. पण शिवसेनेला हव्या असलेल्या सन्मानजनक जागा म्हणजे नेमक्या किती जागा, हे मात्र कळू शकलेलं नाही.

निवडणुका जाहीर होताच ह्या सन्मानजनक जागा किती हे समोर येईलच मात्र तो पर्यंत असा गोंधळ उडवून देऊन चर्चेत राहण्याचा फॉर्म्युला युतीच्या नेत्यांना चांगलाच जमला असल्याचे दिसून येत आहे.

मागे

शरद पवार आणि प्रियंका गांधी एकाच रॅलीत
शरद पवार आणि प्रियंका गांधी एकाच रॅलीत

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभूत झालेल्या कॉंग्रेसने यावेळी महाराष्ट्रात वि....

अधिक वाचा

पुढे  

सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती लपवू शकत नाही
सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती लपवू शकत नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘हाऊडी मोदी’ कार....

Read more