By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलाम 370 केंद्र सरकारने हटविल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. या मुद्द्यावरून भारताला शह देण्याची धमक स्वत:कडे नसलेला पाकिस्तान अन्य देशांकडून मदतीची अपेक्षा करीत होते. मात्र मुस्लिम राष्ट्रांनीही यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला तर अमेरिकेने पाकलाच उलटी तंबी दिली. त्यामुळे पाक ने संयुक्त राष्ट्र संघाकडे धाव घेतली. परंतु संयुक्त राष्ट्र संघानेही मध्यस्थी करण्याची पाकची मागणी नाकारली आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलेच तोंडघशी पडल्याचे चित्र दिसत आहे.
संयुक्त राष्ट्र संघांचे प्रमुख अन्तोंनिया गुतारेस यांच्या मध्यस्थीची मागणी पाकिस्तानने केली होती. त्यावर गुतारेस यांनी भारत पाकिस्तान दरम्यान 1972 मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. या करारानुसार जम्मू काश्मीरमधील स्थितीवर शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढला जाईल, अस नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले . काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्दिपक्षीय मुद्दा आहे. त्यात तिसर्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएम विरोधात संघर्ष करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान ....
अधिक वाचा