ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 09:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

शहर : देश

भारतीय राजकारणातील एक मोठे नेते केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज निधन झालं. बिहारच्या राजकारणातून ते देशाच्या राजकारणात गेले. सध्या मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर त्यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रामविलास पासवान यांचा मुलगा आणि एलजेपी नेते चिराग पासवान यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वीचं त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती.

रामविलास पासवान हे देशातील एक अनुभवी नेते होते. 5 दशकाहून अधिक त्यांच्याकडे राजकारणाचा अनुभव होता. 9 वेळा ते लोकसभा आणि 2 वेळा राज्यसभा खासदार राहिले आहेत. बिहारमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला मोठं केलं. ज्यामुळे त्यांचा दबदबा भारतीय राजकारणात देखील तितकाच होता.

 

मागे

चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा : निलेश राणे
चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा : निलेश राणे

चीन आपली जमीन बळकावतंय. पण आपले राज्यकर्ते कायर आहेत. काँग्रेसची सत्ता असती ....

अधिक वाचा

पुढे  

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं 'ते' वक्तव्य पटलं नाही; संभाजीराजेंची नाराजी
उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं 'ते' वक्तव्य पटलं नाही; संभाजीराजेंची नाराजी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोस....

Read more