By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 04:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
बेगूसराय - आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आणि बिहारचे बेगूसरायचे खासदार गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मिशनरी शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जाणारे बहुतेक भारतीय गोमांस खायला लागतात. असे होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये गीता श्लोक शिकवावेत, असे वक्तव्य मोदी सरकारमधील कॅबिनेटमंत्री असलेल्या गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
खासगी शाळांमध्ये मुलांना गीतेतील श्लोक शिकवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळेत मंदिरेही बांधली पाहिजेत. याचे कारण म्हणजे मिशनरी शाळांमध्ये मुले शिक्षणाद्वारे डीएम, एसपी आणि अभियंता बनतात, परंतु तीच मुले परदेशी जातात आणि गोमांस खातात. त्यांना संस्कार मुळीच मिळत नाहीत. म्हणून लहान मुलांना शाळेत गीता आणि हनुमान चालीसा शिकवायला हवेत, असे गिरीराज म्हणाले.
गिरीराज भागवत कथेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आपली मते व्यक्त करत होते. ते म्हणाले की जर मी सरकारी शाळांमध्ये गीतेचे श्लोका आणि हनुमान चालीसा शिकवण्याबद्दल बोललो तर लोक म्हणतील की मी भगवा अजेंडा राबविला जात आहे. याची सुरुवात खासगी शाळांनी केली पाहिजे, असेही ते म्हणाले. गिरीराज यांनी या पूर्वी केलेल्या वक्तव्यांवर अनेकदा वादही झाले आहेत. लोकसंख्या वाढत आहे, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू न केल्यास देशात सामाजिक समरसता किंवा विकास होणार नाही, असे वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी झाल्याचेही ते म्हणाले होते.
सन १९४७ मध्ये देशाची लोकसंख्या ३३ कोटी होती. आज ती १२५ कोटी आहे. अघोषित लोकसंख्या तर १३६ ते १४१ कोटींवर आहे. आज देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी झाली आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू न केल्यास विकास किंवा सामाजिक समरसता निर्माण होणार नाही, असेही शेवटी गिरीराज म्हणाले.
मुंबई - इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ....
अधिक वाचा