By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 12, 2019 01:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : varanasi
लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल येण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ आहे. सहाव्या टप्प्यासाठीचे मतदान सध्या सुरू आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. स्वत:ला अपघाती हिंदू म्हणवणारे आता मंदिरांच्या फेऱ्या मारत असल्याचे ते म्हणाले. यावेळी अली-बजरंग बली आणि सैन्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. अली बजरंग बली आणि सैन्या संदर्भात जी भाषणे मी केली ती वेळेची गरज होती असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या व्हायरसला अॅंटी डोस देऊन दोन वर्षात संपवल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. माझे भाषण हे एक अॅंटी डोस असून ते वेळोवेळी द्यायला लागते. हे खूप गरजेचे असते असे ते म्हणाले. अमेठी आणि रायबरेली हे मागास शहरात आहे. देशात पहिल्यांदाच जनता उमेदवारा बद्दल विचारत नसल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी जातीवादाचे राजकारण विकासाशी जोडल्याचे ते म्हणाले.
आम्ही उत्तर प्रदेशमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळवण्याचे राजकारण करत आहोत. इतकी मतं मिळाल्यानंतर 74 हून अधिक जागा आम्ही युपीत जिंकू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्यावेळी केवळ पंतप्रधान मोदी यांचे नाव होते, यावेळी माझे नाव देखील असल्याचे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर, प्रयागराज, फूलपूर, आजमगड, संत कबीर नगर, बस्ती, डुमरियागंज, मछलीनगर, प्रतापगड, आंबेडकर नगर, श्रावस्ती आणि भदोही या मतदारसंघात मतदान होत आहे.
लोकसभेच्या ०७ टप्प्यातील मतदानानंतर भाजप आणि एनडीएला महाराष्ट्र आणि उत्त....
अधिक वाचा