ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उर्मिला मातोंडकरला शिवसेनेची ऑफर ?

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उर्मिला मातोंडकरला शिवसेनेची ऑफर ?

शहर : मुंबई

कॉंग्रेसवर नाराज असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर मिळाली असून त्यावर उर्मिला गंभीरपणे विचार करीत असल्याचे म्हटले जाते. त्याच बरोबर उर्मिलाला आपल्या पक्षात घेण्यास मनसे नेतेही  उत्सुक असल्याचे  सूत्रांचे म्हणणे आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की , नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून उर्मिला मातोंडकर यांचा भाजपाचे गोपाल शेट्टी यांनी पराभव केला होता. कार्यकर्त्यामुळे  आपला पराभव झाल्याचे उर्मिला ने कॉंग्रेसच्या वरिष्ठांना धाडलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र आपल हे खाजगी पत्र सार्वजनिक केल्यामुळे उर्मिला भडकली आहे. त्यामुळे उर्मिलाने कॉंग्रेस पक्ष सोडण्याचे निश्चित केल्याचे मुंबईच्या कॉंग्रेसच्या एका पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर संगितले आहे. त्यामुळे आता उर्मिलाला आपल्या पक्षात घेण्यासाठी अन्य पक्षातील नेते उत्सुक आहेत. कारण मराठी मुलगी , मुस्लिम पती आणि प्रसिद्ध अभिनेत्री या उर्मिलाच्या जमेच्या  बाजू प्रत्येक पक्षासाठी बळकटी देणार ठरू शकत.

मागे

तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
तानाजी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

रत्नागिरीतील चिपळूण येथील तिवरे धरण फुटीला खेकडे जबाबदार आहेत हे प्रकरण जर....

अधिक वाचा

पुढे  

कर्नाटक सत्ता संघर्ष : कॉंग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बूकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले
कर्नाटक सत्ता संघर्ष : कॉंग्रेस नेते शिवकुमार यांना हॉटेल बूकिंग असताना मुंबईत पोलिसांनी रोखले

कर्नाटकातील कॉंग्रेस जेडीस च्या सरकारवर संकट ओढले असताना सरकारच्या मदतीस....

Read more