ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 04:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे

शहर : मुंबई

अभिनेञी उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत आता मनसेची साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितलाय. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजपा उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात थेट लढत असणार आहे. उत्तर मुंबईत मोठया संख्येने मराठी मतदार आहेत. उर्मिला मातोंडकर आणि राज ठाकरे यांची जुनी ओळख आहे. राज ठाकरेंनी सर्व मनसे कार्यकर्त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणार नाही.

पण अप्रत्यक्ष मदत करु असे मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले आहे. तर, राज यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते आणि प्रवक्त संदीप देशपांडे शनिवारी शिवाजीपार्कमध्ये काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा प्रचार करताना दिसले. उर्मिला मराठी असून तिला घरघरात ओळखणारा वर्ग आहे. तिच्या या सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा होऊ शकतो. २००४ मध्ये गोविंदाप्रमाणे ती गेमचेंजर ठरु शकते असे मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे मत असल्याने तिला या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

मागे

युवासेनेची नाराजी दुर करण्यासाठी पुनम महाजन मातोश्रीवर दाखल
युवासेनेची नाराजी दुर करण्यासाठी पुनम महाजन मातोश्रीवर दाखल

शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एक....

अधिक वाचा

पुढे  

एकाच वेळी  “चौकीदार” ५००  ठिकाणांवर पोहोचणार
एकाच वेळी “चौकीदार” ५०० ठिकाणांवर पोहोचणार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मैं भी चौकीदार' या मोहिमेअंतर....

Read more