ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इम्तियाज जलील यांची घोषणा

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इम्तियाज जलील यांची घोषणा

शहर : मुंबई

लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान वंचितने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्या अगोदरच एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली.तर  "ओवेसी यांनी जाहीर केल्यानंतर आपण यावर भाष्य करू,”असे  वंचितकडून सांगण्यात आलं आहे.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड होण्याची शक्यता वर्तविली जात होती.

मागे

गडकिल्यांवर हॉटेल सुरू करण्याच्या वृताने सरकारवर टीकेची झोड
गडकिल्यांवर हॉटेल सुरू करण्याच्या वृताने सरकारवर टीकेची झोड

राज्यातील किल्यांच जतन होण महत्वाच असताना महाराष्ट्र सरकारने अशा किल्यां....

अधिक वाचा

पुढे  

स्विस बँकेने भारताला दिली खातेदारांची माहिती
स्विस बँकेने भारताला दिली खातेदारांची माहिती

स्विस सरकारच्या निर्देशानुसार तेथील बँकांनी भारतीयांच्या खात्याबाबतचा ड....

Read more