ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर 'डफली बजाव' आंदोलन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसटी सेवा, सार्वजनिक बससेवा सुरु करा, वंचितचं राज्यभर 'डफली बजाव' आंदोलन

शहर : नागपूर

केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत. याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यामुळे आज राज्यभर डफली बजाव आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती.

राज्यातील एसटी सेवा आणि महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरु झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरु करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो आणि शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफली वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी होती. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील अनेक शहरांमध्ये वंचितकडून डफली बजाव आंदोलन करण्यात आलं.

नागपूर

कोव्हिडच्या प्रदुर्भावाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर आता ते पूर्व पदावर येत असताना राज्य सरकार निर्बंध घालून पुन्हा जनतेला वेठीस धरत आहे. गरिबांची एसटी बस बंद करुन ठेवली त्यामुळे सामान्य माणसाची लूट होत आहे. खाजगी वाहनाला परवानगी दिली जाते, मग एसटीला का नाही, असे वेगवेगळे प्रश्न घेऊन याविरोधात नागपूरच्या मोर भवन चौकात वंचित बहुजन आघाडी तर्फे डफली बाजावो आंदोलन करण्यात आलें.

एका बाजूने सरकार सांगतं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कमी झाली आहे, असं असताना इव्हन ऑड सारखे फॉर्म्युला वापरुन दुकानदार ठप्प आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे. एसटीच्या बसेस देखील बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा बंद ठेवून खाजगी बसच्या माध्यमातून जनतेची लूट सरकार करत असल्याचा आरोप देखील लावला. 15 ऑगस्टपर्यंत सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास बंधने मोडून काढण्याचा इशारा यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

अमरावती

अमरावतीत विभागीय बसस्थानकासमोर वंचित आघाडीने डफली बजाव आंदोलन करत सरकार विरोधात आवाज बुलंद केला. लॉकडाऊन रद्द करा नाही, अन्यथा आम्ही लॉकडाऊन तोडू, या भूमिकेवर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर ठाम आहेत. कारण कोरोनामुळे रोजगार बुडाले, आता पुन्हा लॉकडाऊन नको. तर एसटी बस सेवाही बंद करण्यात आली. बससेवा पुन्हा पूर्वरत करण्यात यावी, तसेच सर्व दुकानं उघडी ठेवावी, असे आवाहन वंचितने आज अमरावतीत केलं. कार्यकर्त्यांनी डफली वाजवून आंदोलन केलं, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कणकवली

सर्वसामान्य लोकांची लॉकडाऊनमुळे होणारी आर्थिक विवंचना तसेच सणासुदीच्या काळात बंद असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्या या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने डफली बजाव आंदोलन केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. गणपती उत्सवासाठी सरकारने एसटी तसेच बेस्टच्या सेवा मर्यादित प्रमाणात सुरु केल्या आहेत. परंतु, त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी होणारी गैरसोय पाहता या सेवा जिल्हाबंदी उठवून त्वरित सुरु करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

परभणी

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने परभणी एसटी बस स्टॅण्डमध्ये डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गरिबाला भाकर मिळालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. गरिबांवर उपासमारीची वेळी आली आहे. त्यामुळे टाळेबंदी उठवून बससेवा तात्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.

सातारा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साताऱ्यात डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. एसटी वाहतूक सुरु करण्याच्या मागणीसाठी सातारा एसटी स्टॅण्डवर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी डफली वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

पंढरपूर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब अंबडेकर यांच्या पुतळ्यासमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनात डफली वाजवत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन शिथिल झालेच पाहिजे. तसेच, राज्यातील सार्वजनिक वाहतूक सुरु झालीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. हे आंदोलन पंढरपूर भारिपचे शहर अध्यक्ष सागर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल.

सोलापूर

वंचितकडून सोलापुरात डफली बजाव आंदोलन करण्यात आले. एसटी वाहतूक सुरु करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी डफली वाजवून शासनाचा निषेध करण्यात आला. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

जळगाव

जळगावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आले. एस टी वाहतूक सुरु करण्याच्या मागणीसाठी जळगाव एसटी स्टॅण्डवर आंदोलन करण्यात आले.

नालासोपारा

सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी सेवा सुरु करावी. या मागणीसाठी वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज नालासोपाऱ्यात डफली वाजवून आंदोलन केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये प्रचंड नागरिकांचे हाल होत आहेत. राज्यशासनाने आता अनलॉक ही सुरु केला आहे. अनेक खाजगी कार्यालय सुरु झाले आहेत. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरळीत वाहतूक सेवा नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोरोना या महामारीने मरण्यापेक्षा आता उपासमारीने मरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

यासाठी राज्यशासनाने एसटी सेवा तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात वंचित आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी डफली वाजवून आंदोलन करण्याची हाक दिली होती. याच पार्श्वभूमीवर वंचित आघाडीचे पालघर जिल्हा युवा अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डफली वाजवून नालासोपारा बस आगारात आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन आगारप्रमुखांना दिले आहेत.

भिवंडी

वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचे भिवंडीत भर पावसात एसटी आगारासमोर डफली बाजावो आंदोलन केलं.

सिंधुदुर्ग

कणकवली येथे वंचित बहुजन आघाडीने डफली बजाव आंदोलन केलं. एसटी आणि सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरु करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. एसटी विभागीय नियंत्रक यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं.

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या डफली बजाव आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वल्लभनगर एसटी स्टॅण्डवर घोषणाबाजी करण्यात आली. लॉकडाऊन हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. एसटी वाहतूक आणि शहरातील पीएमपीएमएल ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

मागे

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट
प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक, मुलगी शर्मिष्ठाने केल भावनिक ट्विट

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, कन्या श....

अधिक वाचा

पुढे  

मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय
मंत्रिमंडळ बैठकीतील 7 मोठे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी....

Read more