By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 07:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
माजी केंद्रीय अर्थ, माहिती व प्रसारण व वाणिज्य मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
“अरुण जेटली देशातील एक द्रष्टे मुत्सद्दी, कायदेतज्ज्ञ, प्रतिभासंपन्न संसदपटू तसेच उत्कृष्ट केंद्रीय मंत्री होते. अमोघ वक्तृत्वकला लाभलेले जेटली राष्ट्राकरिता अनमोल रत्न होते."
केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट, वाणिज्य, उद्योग यांसह इतर अनेक मंत्रालयांचा कारभार सांभाळताना जेटली यांनी आपल्या कामकाजाचे मापदंड निर्माण केले. त्यांनी जनसामान्यांच्या हितासाठी पथदर्शी निर्णय घेतांना उद्योग व व्यवसाय यांच्या वाढीसाठी देखील पूरक निर्णय घेतले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम करण्याचा आपल्याला बहुमान मिळाला. सोबत काम करणाऱ्या सर्वांना ते मार्गदर्शन करीत. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत सर्वाना धक्का दिला आहे. ....
अधिक वाचा