By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 02:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सपशेल फेल ठरले आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना आणि काळजी घेण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, या सरकारच्या काळात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालये सरकारने ताब्यात घ्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली. सरकारने चाचण्या कमी केल्या, रुग्ण संख्या कमी दाखविण्याकडे जास्त लक्ष दिल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
शिवस्मारकाबाबत बैठक नाही
शिवस्मारकाबाबत एकही बैठक घेण्यात आलेली नाही. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबाबत या सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असा थेट आरोप मेटे यांनी यावेळी केला. त्या कार्यालयाच्या जागेवर अतिक्रमण व्हायला लागले आहे, असे ते म्हणालेत.
अण्णासाहेब पाटील मंडळाकडे हे सरकार आल्यापासून मोठे दुर्लक्ष झाले आहे. एक पैसा सुद्धा कुणाला दिलेला नाही. आम्ही मागणी आहे की, २५ हजार देण्याची सरकारला विनंती आहे. मात्र, लक्षचे दिले जात नाही. सरकारने मोठा मार्ग बंद केला आहे, असे विनायक मेटे यावेळी म्हणालेत.
मराठा आरक्षणाबाबत मोठा संभ्रम
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठा संभ्रम होत आहे. याच महिन्यात सुनावणी होणार आहे. त्याबाबत काही हालचाल होताना दिसत नाही. केवळ मेडिकल प्रवेशाच्या बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मूळ याचिकेवर चर्चा होण्याची शक्यता कमी आहे. सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे घेणे अशक्य आहे. मेडिकल प्रवेशाबाबतच सुनावणी घ्यायला पाहिजे, अशी राज्य सरकारला विनंती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणालेत. या सरकारने एकही बैठक घेतली नाही, मराठा समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केले, असा आरोप विनायक मेटे यांनी केला.
...तर मराठा आंदोलन करावं लागेल'
मराठा आंदोलनात अनेकांवर केसेस झाल्या त्याबाबत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. अनेक केसेस तशाच पडून आहेत. ज्यांचं बलिदान दिले त्यासाठी तत्कालीन मदत करण्याची घोषणा केली. मात्र त्याबद्दल हे सरकार काहीच करत नाही. तर कोपर्डीच्या बहिणीला न्याय अजून मिळालेला नाही. मराठा समाजाच्या विरोधात हे सरकार असल्याचे वाटत आहे. या सरकारमधील मराठे नेते २०१४ च्या आधी चुका करत होते ते आता सहा महिन्यांत सुरु झाल्या आहे, असे विनायक मेटे म्हणाले.
मी बोललो त्याकडे सरकारने गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. त्यांनी लक्षात घेऊन काहीच पाऊलं उचलली नाही तर आंदोलन करावं लागेल, असा इशारा विनायक मेटे यांनी यावेळी दिला. मग मराठा समाजाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे ते म्हणाले. झोपेचं सोंग घेतलं असेल तर त्यांना जाग करावं लागेल, असा टोला त्यांनी राज्य सरकारला हाणला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच राजीना....
अधिक वाचा