By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 11, 2021 10:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सिंधदुर्ग
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्याव अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नितेश राणे यांनी एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला आहे. त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते, असा गौप्यस्फोट करतानाच ही केस उघडली तर नितेश राणे तुरुंगात जातील, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
कणकवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या गुन्ह्याप्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती एक ओपन झाली तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राणेंचे मातोश्रीवर फोन
नारायण राणे दोन महिन्यांपूर्वी दिवसातून तीन-तीन वेळा मातोश्रीवर फोन करत होते, असा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. अखेर उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे परवानगी दिली, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, नितेश राणे यांनी अद्याप राऊत यांच्या आरोपाचं खंडन केलेलं नाही. त्यामुळे नितेश राणे नेमकं काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राऊत यांनी केलेल्या या आरोपामुळे नितेश यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची हिंदुत्वाशी नाड कायम असल्याचं, तस....
अधिक वाचा