By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 08, 2019 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
माझं घर भरलेलं आहे, मोदींचं रिकामं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी 40 वर्षे सत्तेत राहून जे काही कमावले ते त्यांनी घरात नेऊन ठेवले, त्यामुळे त्यांचं घर भरलेलं आहे, असा टोला विनोद तावडे यांनी लगावला आहे.
माझं घर भरलेले आहे तुमचं घर आगोदर पाहा असा टोला माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार यांनी काल दौड येथे झालेल्या सभेतून लगावला होता. दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या या टीकेला भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले. शरद पवार म्हणाले की, माझं घर भरलेलं आहे आणि मोदींचं रिकामं आहे. शरद पवार यांनी 40 वर्षे सत्तेवर राहून स्वत:चे घर भरण्याचेच काम केले. मोदींचं काय आहे. ''मै खाता नही खाने देता नही'' मग त्यांचं घर रिमाकमच असणार,'' असे विनोद तावडे म्हणाले. तसेच मुंबईतील सर्व सहाजागांवर युतीचे उमेदवार विजयी होतील, अशे भाकितही तावडे यांनी केले.
मनसे पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यानंतर मतदार नसलेली सेना झ....
अधिक वाचा