By Anuj Kesarkar | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृती अभियानातून फ्लॅश मॉबचे सादरीकरण करण्यात आले.मतदान देशासाठी, लोकशाहीच्या प्रबळतेसाठी, चला मतदान करुया! आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया असा संदेश याद्वारे देण्यात आला. यावेळी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे, अपर जिल्हाधिकारी बन्सी गवळी, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम, अवर सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष मोहोड, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल, मुंबई शहर जिल्हा माध्यम कक्षाचे प्रमुख डॉ.राजू पाटोदकर आणि मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
दि. 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार असून मतदानाबाबत जनजागृती होवून मतदानाचा उत्साह वाढावा, मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी मतदान जनजागृती अभियानातुन पथनाट्य, नृत्य, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविध सादरीकरणातून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित मंत्रालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी व अभ्यागतांनी उत्साही दाद दिली.
मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका उपयुक्त
दरम्यान मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूक -2019 साठी माध्यम कक्षामार्फत तयार करण्यात आलेली मुंबई शहर जिल्हा विधानसभा निवडणूक पूर्वपीठिका श्री. पाटोदकर यांनी भेट दिली. ही पुस्तिका प्रसार माध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. सिंह यांनी सांगितले.
या पुर्वपीठिकेत निवडणूक संदर्भातील मुंबई शहर जिल्हयाची सर्व महत्वाची माहिती दिलेली आहे. तसेच महत्वाचे म्हणजे मुंबई शहर जिल्हयातील 10 विधानसभा मतदार संघाचे 1962 ते 2014 पर्यंतच्या निवडणूकांचे निकाल दिले आहेत.याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे यांनी कौतुक केले.
विधानसभा निवडणूकीच्या संपूर्ण प्रचार कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने मा....
अधिक वाचा