By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 18, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : उस्मानाबाद
लोकसभा निवडणूकीच्या मतदानावेळी धाराशिवमध्ये एका अतिउत्साही तरुणाने मतदान कोणाला केले याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या उद्देशालाच हरताळ फासला आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास व चित्रिकरण करण्यावर बंदी असतानाही तरी देखील मतदान करतानाचे फोटो काढून ते उमेदवाराला पाठविल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवत उघडकीस आला आहे. या आधी त्याने फेसबुक लाईव्ह करून मतदान कुणाला केले हे दाखवले होते. तसेच फोटोही काढले. मात्र त्यानंतर याने फेसबुक लाईव्ह डिलिट केले. दरम्यान, या मतदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आज नरेंद्र मोदींच्या हाती सत्ता आहे, मग देशावर दहशतवादी हल्ले कसे होतात? दहश....
अधिक वाचा