By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 06:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५५ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ५८ टक्के मतदान कोल्हापुरात झाले. तर मुंबई, ठाण्यात निरुत्साह दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात शहरी भागात कमी टक्के मतदान झाल्याचे दिसून येत आहे. तर ग्रामीण भागाच चांगले मतदान झाले आहे. काही ठिकाणी झालेली हाणामारी आणि अमरावतीमधील हल्ला या घटना वगळता मतदान शांततेत झाले.
जालन्यात भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तर करमाळ्यातही दोन गट भिडल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्याच्या समर्थकांमध्ये जुंपलेली दिसून आली. जामखेडमध्ये दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला होता. तर अमरावतीमध्ये वरुड मोर्शी मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची काही हल्लेखोरांनी गाडी जाळली आहे. आज सकाळी ही घटना समोर आली. यात उमेदवार देवेंद्र भुयार थोडक्यात बचावले असून शासकीय रुग्णालय अमरावतीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
चंद्रपूर शहरात मतदानाची टक्केवारी घटली. तीन वाजेपर्यंत चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात केवळ २८ टक्के मतदान, हे मतदान ४५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातही मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज होता. मतदारांचा निरुत्साह आणि ईव्हीएम मधील बिघाड यामुळे टक्केवारी घटल्याचा अंदाज आहे.
बीड वडवणी तालुक्यातील खलवट लीम गाव या गावातील पूल पावसामुळे नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्यानंतर प्रशासनाने तात्काळ मदत उपलब्ध करून देत लोकांना थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून मतदान केंद्रावर आणले. बीड जिल्ह्यात मतदान संथगतीने सुरू असून पाच वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान झाले होते. खळवट लिम गाव या गावातील पूल पुरामुळे वाहून गेल्याने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चप्पूची व्यवस्था केली आणि त्यावरून मतदारांना आणण्यात आले.
मच्छिमारांनी मतदानावर बहिष्कार
वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या मच्छिमारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. वाढवण बंदर परिसरातील १५ ते १६ गावातील सुमारे १० हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. वाढवण समुद्रकिनारा मच्छीमारीसाठी गोल्डन बेल्ट म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी माशांचं प्रजनन होतं. याठिकाणी बंदर झाल्यास हा गोल्डन बेल्ट नष्ट होऊन मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळं आक्रमक पवित्रा घेत १५ गावांनी मतदान न करण्याची भूमिका घेतली.
राज्यभरात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी अवघ....
अधिक वाचा