By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - महाराष्ट्रातील विविध पाच महानगरपालिकेतील सात रिक्त पदांसाठीची पोटनिवडणूकीसाठी 9 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर आणि पनवेल या महानगरपालिकेत एकूण सात नगरसेवक पदांसाठी मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी 10 जानेवारी 2020 ला होणार आहे. अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी दिली.
यासाठी 16 ते 23 डिसेंबर या कालवधीत अर्ज दाखल करता येणार आहे. 16 ते 23 डिसेंबर या कालावधीत 22 डिसेंबरला रविवार आहे. त्यामुळे 22 डिसेंबरला अर्ज स्वीकारले जाणार नाही. इच्छुकांच्या अर्जाची छाननी 24 डिसेंबरला करण्यात येईल. 26 डिसेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.
दरम्यान, उमेदवारांना 27 डिसेंबरला निवडणूक चिन्हे देण्यात येतील. 9 जानेवारी 2020 ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. तर मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
पोटनिवडणूक आणि महानगरपालिकानिहाय प्रभाग -
नाशिक- 22अ आणि 26अ / मालेगाव- 12ड / नागपूर- 12ड / लातूर- 11अ //पनवेल – 19ब / मुंबई – 141
हेलसिंकी - फिनलँच्या सोशल डेमोक्रेट पार्टीने रविवारी पंतप्रधानपदासाठी 34 व....
अधिक वाचा