By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 10:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधिमंडळाच्या कामकाजात अतिशय सक्रिय आणि अभ्यासू आमदार अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्याची झलक विधानसभेत बघायला मिळतेय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिमंडळाने घेतलेल्या शपथविधीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. तर आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी बोलून दाखवली आणि आता ती पूर्ण करा असं आवाहन केलं. आजच फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली त्यावेळी सगळ्यांनी त्याच्या कामाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. या सगळ्या घाई गडबडीत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीचाच पुनरुच्चार करत त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.
विरोधी पक्षात असताना सगळेच पक्ष मोठ मोठ्या मागण्या करतात किंवा आश्वासनं देतात. कारण त्या आपल्याला नाही तर सरकारला पूर्ण करायच्या आहेत याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे पूर्ण करता येऊ शकणार नाही हे माहित असलं तरी त्या मागण्या केल्या जातात. मात्र सत्तेवर येताच त्या मागण्या पूर्ण करण्याची मर्यादा त्यांना लक्षात येते.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं राज्यात प्रचंड नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. विधानसभा निवडणूक निकालानंतर सगळच राजकीय चित्र बदललं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते झाले.
त्यामुळे आता तुम्हीच केलेली मागणी तातडीने पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. हेक्टरी 25 हजार ही मदत करणं सरकारला शक्य नाही हे फडणवीसांनाही माहित आहे. मात्र आता विरोधी पक्षात असल्याने त्यांची भूमिका बदलली आणि त्याचाच फायदा घेत त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल विधानसभेत बहुमतही....
अधिक वाचा