By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 02:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची 'महाजनादेश यात्रा' 1 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस ची 'शिवस्वराज्य यात्रा' 6 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी 'जन आशीर्वाद यात्रेचा' पहिला टप्पा पूर्ण केला. अशा प्रकारे राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असताना कॉंग्रेसमध्ये मात्र काहीच हालचाल दिसत नव्हती. तथापि, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने राज्यातील युवकांसाठी स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्याचे ठरविले आहे.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी,
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 1, 2019
Wake Up Maharashtra - उद्यासाठी आता !#युवा_विचारांची_सत्ता #उद्यासाठी_आत्ता#WakeUpMaharashra #YouthManifesto@RahulGandhi @INCIndia @iyc @ANI @PTI_News pic.twitter.com/ojD8xiFIIp
या माध्यामातून युवक कॉंग्रेस राज्यातील 18 ते 30 वयोगटातील तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील युवकांशी प्रत्यक्ष अथवा ऑनलाइन संपर्क साधून त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा आहे, या बाबत त्यांची मत जाणून घेतली जाणार आहेत. त्यासाठी युवक कॉंग्रेस ने ' वेक अप महाराष्ट्र... उद्यासाठी आता' या अभियानाची सुरुवात केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या का....
अधिक वाचा