By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
जलसंवर्धनासाठी आणि एकदा वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकविरोधात लोकचळवळ बनवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांना केले. ते आज उत्तराखंडच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
उत्तराखंडमध्ये पाणी आणि वनसंपदा मोठ्या प्रमाणावर आढळते. या संसाधनांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. उत्तराखंडमध्ये पर्यटनाला मोठा वाव असून त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते असे नायडू म्हणाले. बदलत्या तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती ठेवून नवीन भारताच्या निर्मितीला हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
येत्या हफ्ताभरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ....
अधिक वाचा