By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2020 01:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एका आहेत. राजकारणातील एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर काम करताना आणि मोठं झालेलं पाहायचंय, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही एकमेकांचा शत्रू नसतो. आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. राजकीय विरोधकांमध्ये चांगले संबंध असणे ही महाराष्ट्राची आजपर्यंतची परंपरा आहे. एकेकाळी शरद पवार हे आमच्याविरोधात होते. तरीही मी त्यांना भेटायचो. यावर अनेकजण आक्षेपही घ्यायचे. मात्र, इतकी वर्षे राजकारणात असणाऱ्या आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करणाऱ्या नेत्याला भेटणे गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे वेळ मिळाल्यावर मी सगळ्याच राजकीय नेत्यांना भेटत असतो, असे संजय राऊत यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस हे तर राज्याचे मुख्यमंत्री होते, आम्ही पाच वर्षे त्यांच्यासोबत काम केले आहे. ते भाजपचा तरुण चेहरा आणि प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. आम्हाला भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठे झालेले पाहायचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही आमचे राजकारण करत राहणार, ते त्यांचे राजकारण पुढे नेतील. या सगळ्यातून एकमेकांना विरोध होणे क्रमप्राप्त आहे, पण म्हणून लगेच तलवार काढायची नसते, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
‘महाराष्ट्राच्या राजकारणात लोक माझं म्हणणं ऐकतात’
‘सामना’ दैनिकासाठीच्या मुलाखतीसाठी मी देवेंद्र फडणवीस यांना मध्यंतरी भेटलो होते, असे संजय राऊत यांनी या कार्यक्रमात सांगितले. तेव्हा कुणाल कामरा याने देवेंद्र फडणवीसांना मलाही मुलाखत द्यायला सांगा, अशी विनंती संजय राऊत यांना केली. त्यावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस तुम्हाला नक्कीच मुलाखत देतील, महाराष्ट्राच्या राजकारणात लोक माझं इतकं म्हणणं तर नक्कीच ऐकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अण्णासाहेब पाटील या आर्थिक मागा....
अधिक वाचा