By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 02, 2020 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास या महिन्यात काम सुरु होणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2022 पर्यंत पूर्ण करू. स्मारकासाठी लागेल तेवढा निधी उभा करू. काही परवानग्यांनंतर स्मारकाचे काम वेगाने सुरू होईल.
अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदू मिलची पाहाणी केली. या कामाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. तसेच राज्य सरकार कायम शेतकर्यांाच्या पाठीशी उभे राहील. कर्जमाफीबाबत उद्या जिल्हाधिकार्यांाशी बोलणार असं ते म्हणाले.
खातेवाटपाला होणार्या विलंबाबद्दल विचारले असता, ते म्हणाले, खाते वाटपाबाबत लवकरच कळेल. दरम्यान, खातेवाटप झाले नसले तरी मंत्र्यांना बंगले वाटप करण्यात आले आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, पवार कुटुंबीय अंधश्रद्धा पाळत नाही. तशी आम्ही शपथ घेतली आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. मंत्रालयातील ६०२ केबिन मी नाकारलेली नाही. केबिन घेतला कोणालाही त्रास दिलेला नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खा....
अधिक वाचा