ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अबब ..... चष्मा घातल्याने करू दिले नाही मतदान !

By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 21, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अबब ..... चष्मा घातल्याने करू दिले नाही मतदान !

शहर : पुणे

आज महाराष्ट्र आणि हरयाणा येथे लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात लोकांनी या लोकशाही उत्सवात सहभागी न होण्याची संधी गमावली नाहीए. मतदान केंद्रावर लोकांनी उत्साहाने जाऊन आपले मत नोंदवलेय पण या दरम्यान महाराष्ट्रात एक अजब प्रकार पाहायला मिळाला आहे. चष्मा घातला म्हणून एका व्यक्तीला मतदान न करू दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोथरूड मधून समोर आलाय.

बाळू शिंदे असं या मतदारची ओळख असून त्यांनी या संदर्भात तक्रार नोंदवली आहे. मतदानावरील ओळखपत्रावर फोटोत चष्मा नव्हता पण मतदार बाळू शिंदे ज्यावेळी मतदान करायला गेले होते त्यावेळी त्यांनी चष्मा घातला होता. त्यामुळे बाळू शिंदे यांना मतदानाचा हक्क बजावू शकले नाहीत. दरम्यान अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.

पुढे  

महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 45 % आणि हरियाणात 55% मतदान
महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 45 % आणि हरियाणात 55% मतदान

महाराष्ट्राच्या 288 आणि हरियाणाच्या 90 विधानसभा जागांसाठी मतदान सुरु आहे. मुख....

Read more