ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जाणून घ्या, नव्या 13 मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे?

शहर : मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 13 नव्या मंत्र्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी शपथ दिली. यामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात आलेल्या नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील, माजी विरोधी पक्षनेते (कॅबिनेट)

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांचे पुत्र सुजय यांना लोकसभेसाठी नगरमधून काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानं त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली होती. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देत विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अद्याप अधिकृतरित्या विखेंनी भाजपात प्रवेश केला नाही

जयदत्त क्षीरसागर, शिवसेना आमदार (कॅबिनेट)

मराठवाड्याच्या राजकारणातलं क्षीरसागर हे मोठं घराणं आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. क्षीरसागर हे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर विरोधक आणि मराठवाड्यातले महत्त्वाचे नेते मानले जातात.

ॅड आशिष शेलार, आमदार, मुंबई (कॅबिनेट)

सलग दोन टर्म, गेली सहा वर्षे मुंबई भाजपाचे अध्यक्ष, सन2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाने 33 जागांवरून तब्बल 83जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले. या निवडणुकीत आमदार ॅड आशिष शेलार यांनी मुंबई भाजपाचे नेतृत् केले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत युतीच्या उमेदवारांना भरघोस यश मिळालं.

प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप राळेगाव विधानसभा (कॅबिनेट मंत्रिपद)

२०१४ मध्ये पहिल्यांदाच माजी शिक्षणमंत्री काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंतराव पुरके यांचा पराभव करून प्राचार्य डॉ. अशोक उईके विजयी झाले. विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती समितीचे विद्यमान अध्यक्ष. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीमंडळात समावेश.

प्रा.डॉ. तानाजी सावंत, आमदार, शिवसेना यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघ (कॅबिनेट मंत्रिपद)

२०१६ मध्ये यवतमाळ जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे यांचा पराभव करून शिवसेनेचे प्रा.डॉ. तानाजी सावंत विजयी झाले. शिक्षण साखर सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे विद्यमान उपनेते. शिवसेनेचे उस्मानाबाद सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख.

सुरेश खाडे, आमदार - भाजपा (कॅबिनेट)

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ आमदार म्हणून सुरेश खाडे यांची ओळख आहे. भाजपाचा . महाराष्ट्रातला अनुसुचित जातीचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सांगली जिल्ह्यात काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात खाडेंचा मोठा वाटा आहे. 2004 साली सांगली जिल्ह्यातल्या जतमधून विजयी झाले होते. सांगली मिरज-कुपवाड मनपावर भाजपची सत्ता आणण्यात महत्वाचे योगदान आहे.

डॉ. संजय कुटे, आमदार, भाजपा (कॅबिनेट)

जळगाव-जामोदचे आमदार आहेत, बुलढाण्यातला भाजपाचा चेहरा असून 2003 मध्ये जळगाव-जामोदचे तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असणारे कुटे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी देण्यात आली आहे. 2004, 2009, 2014 सलग तीन वेळा कुटे विधानसभेवर निवडून आले आहेत.

डॉ. अनिल बोंडे, भाजपा, आमदार, धुळे (कॅबिनेट)

डॉ. अनिल बोंडे हे मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. ५४ वर्षांचे आमदार बोंडे हे एमबीबीएस, एमडी आहेत. १९९६ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००२ ते २००५ या कालावधीत ते जिल्हाप्रमुख होते. त्यांनी २००४ मध्ये शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या  विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ते ४१ हजार मतांनी विजयी झाले होते.

संजय भेगडे, आमदार, मावळ (राज्यमंत्री)

भारतीय जनता पक्षाचे पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात चांगले काम केल्याने त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. 2014 मध्ये मावळ मधून विधानसभेवर निवडून आले बाळा भेगडे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत.

अतुल सावे - आमदार, भाजपा (राज्यमंत्री)

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत, त्यांनी 2014 ला काँग्रेस उमेदवाराचा पराभवन करुन त्यांनी विजय मिळविला होता. अतुल सावेंचे वडील मोरेश्वर सावे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे पहिले खासदार होते. त्यानंतर सावे कुटुंबीय शिवसेना सोडून भाजपात आले. भाजपात अतुल सावेंना जिल्हाध्यक्ष आहेत.

अविनाश महातेकर, आरपीआय नेते (राज्यमंत्री)

महातेकर हे दलित पॅँथरचे संस्थापक सदस्य आहेत. रामदास आठवले यांच्या आरपीआयमध्ये ते राष्ट्रीय प्रवक्ते आणि सरचिटणीस पदावर काम करतात. आंबेडकर चळवळीचे अनुयायी म्हणून त्यांची ओळख आहे.

योगेश सागर, आमदार, भाजपा (राज्यमंत्री)

महेता यांना शह देण्यासाठी चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर यांची वर्णी लागली आहे. सागर हे दुसऱ्या वेळी निवडून आले आहेत. नगरसेवक असल्यापासून त्यांचा चारकोप परिसरात चांगला दरारा आहे.

डॉ. परिणय फुके - आमदार, भंडारा-गोंदिया विधानपरिषद (राज्यमंत्री)

राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2007 पासून नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून केली. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी काम करत फुके यांनी आपली राजकीय पटलावर आपली छाप निर्माण केली. ऑक्टोबर 2016 मध्ये भाजपाकडून त्यांना भंडारा-गोंदिया विधानपरिषद मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. यात अनेक दिग्गजांना पराभूत करत फुके यांनी विजय मिळविला.

 

मागे

'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या
'टीम देवेंद्र' विस्तारात कोणत्या विभागाला किती वाटा?; जाणून घ्या

अनेक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. राज्....

अधिक वाचा

पुढे  

आता मजबूत सरकार, राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे
आता मजबूत सरकार, राम मंदिर उभारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही- उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीनंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मजबुत सरकार आले आहे. त....

Read more