By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 25, 2019 08:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : panvel
मुंबईतील सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर घणाघाती हल्ल्या केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पनवेलमध्ये धडाडणार आहे. भांडूपमधील सभेत मोदींच्या गुजरातमधील जन्मगावात शौचालयेच नसल्याची पोलखोल केल्यानंतर राज आज मोदी सरकारच्या कोणत्या योजनेचा पर्दाफाश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. खांदेश्वर स्थानकाजवळील गणेश मैदानावर राज यांची सभा होत आहे.
गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारयात्रेत तुफान गर्दी होत आहे, असा दावा भाजपच्या आयटी सेलने केला, पण जेव्हा त्या सत्यतेचा शोध एका वृत्तवाहिनीने घेतला त्यावेळेस लक्षात आलं की भाजपच्या आयटीसेलने अटलजींच्या अंत्ययात्रेतील फुटेज आणि फोटो वापरले, यावर भाजप का बोलत नाही, अशी थेट विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
देशातील निष्णात वकील कपिल सिब्बल ह्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं त्याचा सारांश, नोटबंदीच्या अगोदर उर्जित पटेल ह्यांच्या सहीने 2 हजारच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या, त्या नोटा भारतात आणून जुन्या नोटांच्या बदल्यात जवळपास 3 लाख कोटी रुपये बदलून दिले गेले, असे राज म्हणाले. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर जाऊन पाहण्यास आवाहन केले.
राज म्हणाले, ही लोकसभा निवडणूक विलक्षण आहे, जो पक्ष निवडणूक लढवत नाही, त्या पक्षावर सत्ताधार्यांकडून टीका होत आहे. बरं माझ्या पक्षावर टीका केल्याने मला काही फरक पडणार नाही पण सत्ताधार्यांना नक्की पडणार आहे. प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या सत्ताधार्यांना खोटं बोलायची का वेळ येते?
राज पुढे म्हणाले, वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार मोदी देणार होते त्याचं काय झालं? मेक इन इंडियाचं काय झालं? स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?नोटबंदी कोणालाही विश्वासात न घेता का लादली? ह्या नोटबंदीच्या रांगेत अनेक माणसं गेली, 4.5 ते 5 कोटी लोकांच्या नोकर्या गेल्या. ह्यावर मोदी कधी बोलणार?
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिल रोजी राज्यातील 17 मतदारसं....
अधिक वाचा