ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एनडीए सरकार आल्यावर रामदास आठवलेंना दिलं मंत्रीपदाचं आश्वासन

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एनडीए सरकार आल्यावर रामदास आठवलेंना दिलं मंत्रीपदाचं आश्वासन

शहर : मुंबई

एनडीए सरकार आल्यावर मला मंत्रीपद तसेच महाराष्ट्रात मंत्रीपद आणि महामंडळ देण्याचा आश्वासन दिले गेले असल्याचे सामाजिक न्याय व विकास मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. मुलुंडमधील भीम महोत्सव या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी रामदास आठवले आले होते त्यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी त्यांची भेट घेतली. तर,आगामी लोकसभा निवडणुकीत युतीत असलेल्या रामदास आठवलेंना उमेदवारी मिळण्याची आशा होती. पण भाजपा आणि सेनेत झालेल्या उमेदवारीच्या वाटाघाटीत रामदास आठवलेंना स्थान दिले गेले नाही. त्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. माञ,मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याने मी नाराजी न ठेवता पुन्हा प्रचाराला लागलो आहे अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. राजकारणात काम करायचं असतं तेव्हा प्रत्येक इच्छा पूर्ण होत नाही असेही ते म्हणाले. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी देखील आठवले यांना उमेदवारी न दिल्यास प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर, काँग्रेस राष्ट्रवादीकडून आम्हाला निरोप येतो आहे पण आम्ही मोदींसोबत राहणार आहोत असं रामदास आठवले यांनी सांगितेल. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरपीआयच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचेही ते म्हणाले. आम्हाला अनुल्लेखाने मारू नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यामुळे त्यांच्या उमेदवारी मिळण्याच्या भावना तीव्र होत्या हेच स्पष्ट होत आहे.               

मागे

एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे
एका महिन्यात विरोधी पक्षांच्या १० नेत्यांवर छापे

निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यक....

अधिक वाचा

पुढे  

आज राज ठाकरेंची नांदेडमध्ये पहिली सभा
आज राज ठाकरेंची नांदेडमध्ये पहिली सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील प्रचार सभेंचा झ....

Read more