ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला माहित नाही, मग कागदपत्र कसली मागता” - प्रकाश आंबेडकर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

          मुंबई - “अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.

 

         “या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारनेच पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझा समावेश असल्याचा आरोप केला होता. आता हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.    

 

        “भाजप, आरएसएस देशात अराजकता माजवत आहे. हा कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अर्थव्यवस्थेविरुद्ध डफडी वाजवली असती, तर आम्हाला वेगळी डफडी वाजवायला लागली नसती”, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. 


         “ज्याच्याकडे जमीन त्याच्याकडे कागदपत्र, जमीन नाही त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला माहित नाही. मग कागदपत्र कसली मागता”, असा सवालही यावेळी त्यांनी भाजप सरकारला विचारला.


         “जो यांना विरोध करणार त्याचे नागरिकत्व यांना काढायचे आहे. त्यानंतर हे मताचे अधिकार काढून घेणार. हे विचार करुन जाणीवपूर्वक सुरु आहे. हा कायदा फक्त इथल्या हिंदूंविरोधी असून मुस्लीमविरोधी असल्याचे भासवले जात आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.


         “मुंबईतील लोकांसाठी डिटेंशन सेंटर दोन ठिकाणी आहेत. एक खारघरमध्ये आहे, तर दुसरे नेरुळ येथे आहे. खारघरमधील डिटेंशन सेंटरमध्ये कमीत कमी दोन लाख लोक राहतील एवढी मोठी जागा आहे. जे सरकारविरोधी ओरडतील त्यांच्यासाठी हे सेंटर तयार केले आहेत”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.
 

मागे

खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा गायकवाड यांचा दावा
खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा गायकवाड यांचा दावा

            कल्याण - केडीएमसीमधील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्....

अधिक वाचा

पुढे  

सर्व हिंदू आहेत असं म्हणणे योग्य नाही : आठवले
सर्व हिंदू आहेत असं म्हणणे योग्य नाही : आठवले

           देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्....

Read more