By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2024 07:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे या यशाचे शिल्पकार आहेत. पण त्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या विजयाचे श्रेय मराठा समाजाला दिले आहे. भविष्यात काही अडचणी आल्या तरी समाजासाठी लढत राहण्याचा निर्धार पण त्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजालाा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या लढ्याला मोठे यश आले. या लढ्याचे संघर्षयोद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील ओळखल्या जातात. मराठा आरक्षणासंबंधीत शासकीय आदेश आल्यानंतर जरांगे पाटील यांना या यशाचे शिल्पकार मानण्यात येत आहे. पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही तर संपूर्ण मराठा समाजाचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आरक्षण मिळण्याचे श्रेय पूर्णपणे मराठा समाजाचे असल्याचे त्यांनी नम्रपणे सांगितले. भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या. जीआर संदर्भात असो वा समाजाविषयी इतक कोणती अडचण आली तर लढत राहण्याचे आश्वासन जरांगे पाटील यांनी दिले.
विजयाचा जल्लोष
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारच्या लढ्याची घोषणा केली होती. मुंबईच्या वेळीवर त्यांनी तळ ठोकताच राज्य सरकारने युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा हलवली. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीला यश आले. त्यांनी सुचवलेले अनेक बदल राज्य सरकारने मान्य केले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रात्रीतूनच यासंबंधीचा शासन आदेश, परिपत्रक काढण्यात आले. त्यात सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या. रात्री दोन वाजता त्याची प्रत त्यांना देण्यात आली. त्यामुळे वाशीमध्ये सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. अनेकांनी ही मराठा बांधवासाठी दिवाळी असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. सकाळपासूनच राज्यातील अनेक गावात फटाके फुटले. आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
विजयी सभा कुठे घेणार?
थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीत एकाच मंचावर येणार आहेत. याठिकाणी मुख्यमंत्री मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवतील. तसेच शासनाच्या भूमिकेची माहिती देतील. आता विजय कुठे साजरा करणार, विजयी सभा कुठे घेणार असे पत्रकारांनी विचारले असता. वाशीमध्ये जल्लोष झाल्यानंतर अंतरवाली सराटीत विजयी सभा घेणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. एकूणच या विजयामुळे मराठा समाजाचा आनंदाचे वातावरण आहे. आता थोड्याच वेळात होणऱ्या सभेत जरांगे पाटील या निर्णयाविषयी माहिती देतील.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज ....
अधिक वाचा