By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 31, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोणी आचारसंहितेचा भंग करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासही आयोग तयार आहे. आता आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे आणि अधिकाऱ्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. याबाबत एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार अश्विनीकुमार चौबे यांच्या गाड्यांचा ताफा बक्सरचे एसडीए उपाध्याय यांनी थांबवला. आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होत असून अधिक गाड्या असल्याबाबत अधिकाऱ्यांनी विचारले. तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला. व्हिडीओत अधिकारी समजावणीच्या सुरात बोलताना दिसत असून भडकलेले मंत्री अश्विनीकुमार चौबे काहीच ऐकत नाहीत. त्यांनी कुणाचा आदेश आहे, मला तुरुंगात पाठवा असेही म्हटल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य....
अधिक वाचा