By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 26, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा (26 नोव्हेंबर) अत्यंत महत्त्वाचा ठरला. सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीची तात्काळ बहुमत चाचणीची मागणी मान्य केली. बुधवारी (27 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत फडणवीस सरकारला आपलं संख्याबळ सिद्ध करण्याचे आदेश दिले. तसेच बहुमताची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी विधानसभा अध्यक्षांना अधिकार दिले आहेत. त्यामुळे प्रोटेम स्पीकरविषयीची उत्सुकता वाढली आहे.
बहुमत चाचणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेच प्रोटेम स्पीकर कोण असेल हे ठरवतील (Protem Speaker of Assembly). सामान्यपणे सर्वात ज्येष्ठ विधीमंडळ नेत्याला प्रोटेम स्पीकर करण्याचा विधीमंडळाचा आजपर्यंतचा संकेत राहिला आहे. प्रोटेम स्पीकरची निवड बहुमत चाचणीत महत्त्वाची मानली जात आहे. कारण सर्व पक्षांना आपल्या व्हिपची माहिती प्रोटेम स्पीकरलाच द्यावी लागते. त्यानंतर तेच कुणाला विधीमंडळ नेता मानायचं हे ठरवतील.
प्रोटेम स्पीकर कोण असतो?
प्रोटेम स्पीकर या शब्दात प्रोटेम हा शब्द लॅटिन भाषेतील प्रो टॅम्पोर या शब्दाचं संक्षिप्त रुप आहे. त्याचा अर्थ तात्पुरत्या स्वरुपाचा असा आहे. प्रोटेम स्पीकर निवडणुकीनंतर पहिल्या सत्रात विधीमंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करुपर्यंत कामकाज पाहतात. त्यांचं कामाचं स्वरुप हंगामी असतं. विधानसभेत प्रोटेम स्पीकरची नेमणूक राज्यपाल करतात.
प्रोटेम स्पीकर हेच नवनियुक्त विधीमंडळ सदस्यांना (आमदार) शपथ देतात. त्यांच्याच देखरेखीखाली आमदारकीच्या शपथीची प्रक्रिया पूर्ण होते. जोपर्यंत आमदारांना शपथ दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना विधीमंडळांचा सदस्य मानले जात नाही. म्हणूनच सर्वात आधी आमदारांना शपथ दिली जाते.
“सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा आम्ही आदर करतो. उद्या वि....
अधिक वाचा