By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2019 12:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जसजशी 9 नोव्हेंबर ही तारीख जवळ जवळ येऊ लागली तस तशी राजकीय नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. काहीही करून भाजपला आपलाच मुख्यमंत्री करायचाय. त्यासाठी आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी भाजप – शिवसेनेत शिष्टाई करणार असल्याचे समजते. त्यातून मुख्यमंत्री पद सोडून अन्य खाती सम समान ठेवण्याचा फॉर्म्युला असू शकतो. त्यात ही सेनेला प्रमुख खाती हवी आहेत.
दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमार्फत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेले 13 दिवस जी सत्ता स्थापनेची कोंडी झाली होती ती आता फुटणार असल्याचे चित्र निर्माण झालय. कारणं जेआर 9 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. राष्ट्रपती राजवट 6 महीने ते 3 वर्षापर्यंत राहू शकते. तसे होऊ नये म्हणून येत्या 2 दिवसात भाजप सत्ता स्थापन करुळ असे दिसते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही कामाला लागले आहेत. दिल्लीतून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्रात येत असल्याचे कळले तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची शिवसेनेचे संजय राऊत पुन्हा भेट होणार असल्याचे वृत्त आहे. यातून सस्पेन्स वाढल्याचे जारी दिसत असले तरी आजचा दिवस त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. आजच ठरेल की शिवसेना भाजपसोबत जाणार की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार ? मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेचे एक पाऊल मागे घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भाजप – शिवसेना महाआघाडीचे सरकार स्थापन होईल अशी चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाम....
अधिक वाचा