ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2019 07:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, यावर राहुल गांधींनी केले सूचक भाष्य

शहर : देश

काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करु पाहात आहेत. ते भविष्यातील पंतप्रधान असतील, अशीही चर्चा सध्या रंगू लागली आहे. मात्र, महाआघाडीच्या घटक पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. त्यामुळे देशाचा कोण असणार पंतप्रधान, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्यामुळे त्यांनी यावर सूचक भाष्य केले. देशाचा पुढील पंतप्रधान हा जनता ठरवेल, असे राहुल गांधी म्हणालेत. मात्र, असे म्हणताना जबाबदारी आली तर ती पार पाडू, असे संकेतही त्यांनी यावेळी दिलेत. भाजपकडून पंतप्रधानपद म्हणून नरेंद्र मोदींचे नाव पुन्हा एकदा पुढे केले आहेत. भाजपकडून सात्याने तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगा, तुमच्याकडे नाव नाही, अशी टीका केली. महाआघाडीचा प्रत्येक एकजण दिवसा असेल, असे म्हणत खिल्लीही उडविली होती.

 

येत्या काळात पंतप्रधानपद द्यायचं की नाही याबाबत देशातली जनता ठरवेल, राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर दावा करणे टाळले. मात्र भविष्यात संधी मिळाली तर पंतप्रधान होण्यासाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. दक्षिण भारतातल्या जनतेसोबत काँग्रेस असल्याचा संदेश देण्यासाठीच वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माध्यमांसमोर का येत नाही ? ते प्रश्नांना घाबर आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक २०१९ चा काँग्रेसने  आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यावेळी राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जनतेची मन की बात आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या हे मुद्दे देशातील वास्तव आहेत. तसेच भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर नरेंद्र मोदींनी थेट माझ्यांशी चर्चा करुन दाखवावी, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

देशातील गरीब जनतेला समोर ठेवून हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात येत आहे. बंद खोलीत बसून हा जाहीरनामा बनवण्यात आला नसून यासाठी आम्ही जनतेशी बोललो, त्यांच्या मागण्या ऐकल्या असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. लोकांच्या मतांचा विचार करुनच हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचे राहुल गाधी म्हणालेत.

मागे

योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
योगींच्या 'मोदी की सेना' विधानानं वाद; माजी नौदल प्रमुखांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भारतीय लष्कराला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदि....

अधिक वाचा

पुढे  

लोकसभा निवडणूक २०१९ : प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान
लोकसभा निवडणूक २०१९ : प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर नेत्यांची एकमेकांवरच्या टीप्पणी ज....

Read more