ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 23, 2024 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्येत मशीद बांधणार? रामलल्लाच्या अभिषेक दरम्यान मुस्लिम पक्षाची घोषणा

शहर : देश

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण अयोध्या उजळून निघाली आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर निकला दिला. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधले जाईल, तर मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी जागेचा तुकडा दिला जाईल, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे संपूर्ण अयोध्या उजळून निघाली आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर निकला दिला. वादग्रस्त जागेवर मंदिर बांधले जाईल, तर मुस्लिम पक्षाला मशीद बांधण्यासाठी जागेचा तुकडा दिला जाईल, असे आदेश न्यायालयाने दिले होते. याच जागेवर मशीद बांधण्याचा निर्णय मुस्लीम पक्षाने घेतला आहे अशी मोठी माहिती समोर आली आहे.

इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन विकास समितीचे प्रमुख हाजी अराफात शेख यांनी याची माहिती दिली आहे. पैगंबर मुहम्मद यांच्या नावावरून या मशिदीचे नावमस्जिद मुहम्मद बिन अब्दुल्लाठेवण्यात येणार आहे. यासोबतच मशिदीसाठी पैसे उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइटही सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील भव्य मशिदीचे बांधकाम या वर्षी मे महिन्यापासून सुरू होईल आणि ते पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. अयोध्येतील धन्नीपूर गावात वाटप केलेल्या जमिनीवर प्रस्तावित मशीद बांधण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

मशिदीसाठी पैसे उभारण्यासाठी क्राऊड फंडिंग वेबसाइट तयार केली जाणार आहे. तसेच, मशिदीचे नावमस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्लाअसे ठेवण्यात येणार आहे. लोकांमधील शत्रुत्व आणि द्वेष दूर करून त्याचे एकमेकांवरील प्रेमात रूपांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करा किंवा करू नका. परंतु, आपण जर आपल्या मुलांना आणि लोकांना काही चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ही सर्व लढाई थांबेल. मशिदीच्या डिझाइनमध्ये काही अधिक पारंपारिक घटक जोडायचे आहेत त्यामुळेच बांधकामाला विलंब झाला आहे असेही कारण त्यांनी दिले.

मागे

आज, उद्या, परवा… तीन दिवस ईडी चौकशीचे; महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची चौकशी
आज, उद्या, परवा… तीन दिवस ईडी चौकशीचे; महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची चौकशी

महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आह. आमदार र....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत
शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संजय राऊत

शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती- संज....

Read more