By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 23, 2019 03:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला. महाविकासआघाडीचे सरकार येता येता सकाळी भाजपचे सरकार विराजमान होण्याची बातमी आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बारामतीत काही ठिकाणी पोस्टर झळकले आहेत. समाजमाध्यमांत एक पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे. ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत!’, समस्त बारामतीकर, असे शब्द असलेले हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शरद पवारांच्या बारामतीत दोन पवार गट पाहायला मिळत आहेत. एका गटाने शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. बारामतीत फटाक्यांची आतषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
दुसरीकडे मात्र, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे मुख्यालय असलेल्या राष्ट्रवादी भवनामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाने बारामतीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्यासोबत असणारे तीन आमदार पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आले. त्यांनी आपल्या काहीही कल्पना दिली नाही. केवळ बैठक आहे. तुम्ही या असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही गेल्याचे स्पष्ट केले. तर शरद पवार यांनी जे कोणी जाईल, त्याच्याविरोधात पोटनिवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकासआघाडीकडून एकत्रितपणे हरविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयाविषयी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस....
अधिक वाचा