ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काँग्रेसचे आमदार गोरंट्यालही राजीनामा देणार?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

काँग्रेसचे आमदार गोरंट्यालही राजीनामा देणार?

शहर : जालना

         जालना - काँग्रेसमधून शिवसेनेते दाखल झालेले अब्दुल सत्तार याना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देत बंडाचे निशाण उभारल्यानतर आता काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल हे देखील मंत्रिपद न मिळाल्याने बंडाच्या तयारीत आहेत. आपण कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून काय निर्णय घ्यायचा ते ठरवू असे आमदार गोरंट्याल यांनी म्हटले आहे. गोरंट्याल यांनीही राजीनामा दिल्यास हा महाराष्ट्र विकास आघाडीला दुसरा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


        याबाबत काय निर्णय घ्यावा याबाबत विचार करण्यासाठी महेश भवन येथे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. गोरंट्याल यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत आपल्यावर अन्याय झाला आहे अशी भावना व्यक्त केली आहे. आपला मंत्री मंडळात समावेश करण्याचे आश्वासन मिळाले होते, पण ऐनवेळेस आपल्याला का डावलले हे समजत नाही. आपण तीनवेळा निवडून आलो आहोत. आता तर शिवसेनेचे राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांचा मोठ्या फरकाने आपण पराभव केला आहे. असे असतानाही आपल्याला डावलले अशी खंत गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे.


           जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. अशा जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कॅलास गोरंट्याल यांनी प्रयत्न केल्याने त्यांचे काम महत्त्वाचे असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गोरंट्याल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जागा मिळवून दिल्याचेही समर्थक सतत निदर्शनास आणून देत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ असतानाही त्यांना मंत्रीमंडळात स्थान का मिळाले नाही असे प्रश्न त्यांचे नाराज कार्यकर्ते विचारू लागले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. या संदर्भात गोरंट्याल यांनी आज (शनिवार ४ डिसेंबर) आपली भूमिका ठरवण्यासाठी बैठक बोलवली आहे.
 

मागे

सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा - अर्जुन खोतकर
सत्तारांचा राजीनामा ही केवळ अफवा - अर्जुन खोतकर

        अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला ही केवळ अफवा आहे. त्यांनी आपल्....

अधिक वाचा

पुढे  

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी  महाविकास आघाडीची  बाजी तर उपाध्यक्ष भाजपचा!
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीची बाजी तर उपाध्यक्ष भाजपचा!

        औरंगाबाद - काल औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणूक प्र....

Read more