By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 31, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींसह एकूण 58 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्यामध्ये 25 कॅबिनेट, 9 स्वतंत्र कारभार आणि 24 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली आहे. आज ते BIMSTEC देशांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा करत आहेत. आज मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या कॅबिनेटमध्ये अमेठीतून निवडून आलेल्या 43 वर्षीय स्मृती इराणी हे सर्वात युवा मंत्री आहेत. तर एनडीएचा भाग असलेले आणि लोजपाचे अध्यक्ष 73 वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वरिष्ठ मंत्री आहेत. मोदींच्या नव्या कॅबिनेटचं सरासरी वय 59.36 वर्ष आहे. 2014 मध्ये हे 62 वर्ष होतं. म्हणजेच मोदींचं 2019 चं नवं सरकार 2 वर्ष आणखी युवा आहे.
खातेवाटप होणार जाहीर
मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्य़ात आली आहे. तर काही मोठे नेते मंत्रीमंडळात नसल्याने त्यांच्या जागी कोणाला मंत्रीपद मिळेल याबाबत देखील उत्सुकता आहे. थोड्याच वेळात खातेवाटर जाहीर होईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीआधीच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
भारताचा विकास आणि प्रगतीसाठी आम्ही मोदी सरकारसोबत एकदिलाने काम करायला तया....
अधिक वाचा