ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेशिवाय राज्यात भाजपला पर्याय नाही - संजय राऊत

शहर : मुंबई

राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर यावेळी शिवसेना विधनसभा निवडणुकीच्या निकालात 100 चा आकडा पार करेल असा आत्मविश्वासही व्यक्त केला.राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या मोठय़ा विजयाचा विश्वास व्यक्त केला.

महायुती 200 चा आकडा पार करेल असा दावाही त्यांनी केला. महायुती 200 च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला. एक्झिट पोल आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पोल घेण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही. शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने निकाल लागणार हे स्पष्ट होतं.

संजय राऊत म्हणाले, मी गुळगुळीत बोलत नाही. मी अनेक वर्ष शिवसेनेत आहे. शिवसेनेचं काम करत आहे. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे, त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही. शिवसेना पुढील सत्तेतही राहील. कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्मय नाही. उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

मागे

निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु
निकालाआधीच कॉंग्रेस - राष्ट्रवादीत तू तू मै मै सुरु

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. तथापि गेले दोन दिवस राष्ट्रवाद....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसं....

Read more