By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ballabhgarh
नवज्योतसिंग सिद्धू सध्या प्रचारात व्यस्त असून आपल्या सभेतून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. असे असतानाही त्यांच्या एका सभेत चक्क नरेंद्र मोदींच्याच घोषणांचा आवाज घुमला. याशिवाय एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली. हरयाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योत सिंग सिद्धूंची गुरुवारी सभा झाली. या सभेदरम्यान उपस्थितांनी ’मोदी.. मोदी..’ अशा घोषणा दिल्या. तर, यावेळी एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल व्यासपीठाजवळ येऊन पडली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.
नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने चप्पल फेकणार्या महिलेचं नाव जितेंद्र कौर सांगण्यात येत आहे. जितेंद्र कौर हिने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने असे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.याशिवाय, नवज्योत सिंग सिद्धू सभा आटोपून जात असताना काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.तसेच, ’मोदी.. मोदी..’ अशा घोषणा दिल्या. यावेळी झेंडे दाखविणारे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा आणि काँग्रे....
अधिक वाचा