By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर संताप व्यक्त करताना 'रेप इन इंडिया' असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. या वक्तव्याविरोधात भाजपच्या महिला खासदारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून राहुल यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या महिला खासदारांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे जाऊन ही तक्रार केली आहे.
राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य धक्कादायक आहे. त्याकडे आम्ही निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं आहे. या विधानाची गंभीर दखल घेऊन त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली असून कायदेशीर प्रक्रियेनुसारच न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं स्मृति इराणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
झारखंडमध्ये निवडणुका होत असून राहुल गांधी अशी वक्तव्ये करून राजकारण करत आहेत. महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा ते राहुल राजकीय शस्त्रासारखा वापर करत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असंही त्या म्हणल्या.
जगभरातून भारतात मोठी गुंतवणूक व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडियाचा नारा’ दिला आहे. तर राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ चा वापर केला आहे. अशा प्रकारचं आवाहन करणं हे पीडित महिलांच्या कुटुंबीयांचाच अवमान आहे व त्याची निवडणूक आयोगानं गांभीर्याने दखल घेईल.
पुणे - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा व....
अधिक वाचा