ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2019 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

शहर : जळगाव

भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारीही भाजपाचा प्रवेश करत आहेत. कधीकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपा पक्षात घेत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून भाजपवर होते आहे. हाच धागा पकडत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टिप्पणी केली होती. 'भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात?', असा प्रविचारला आहोत. मुख्यमंत्र्यांनी या टीकेवर जशास तसं प्रत्युत्तर दिलं. भुसावळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की ,आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत असून पक्षात प्रवेश करत आहेत. सध्याविरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास देसेनासा झाला आहे. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी तुम्ही  स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

 

मागे

धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला नजरकैदेत ठेवता, सत्तेची एवढी मस्ती कशासाठी - अजित पवार
धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नीला नजरकैदेत ठेवता, सत्तेची एवढी मस्ती कशासाठी - अजित पवार

शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांच्या विधवा प....

अधिक वाचा

पुढे  

'पीक विमा योजना  एक घोटाळा आहे असं शिवसेना म्हणत असेल, तर शिवसेनाही त्याला जबाबदार'- नवाब मलिक
'पीक विमा योजना एक घोटाळा आहे असं शिवसेना म्हणत असेल, तर शिवसेनाही त्याला जबाबदार'- नवाब मलिक

पीक विमा योजना हा एक घोटाळा आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घे....

Read more