By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 11:42 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातून ‘आप’ लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे या पक्षाचे प्रदेश निमंत्रक सुधीर सावंत यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखण्याची गरज आहे. हे लोक राज्यघटना मोडीत काढून हुकूमशाही आणतील, असा इशारा सावंत यांनी दिला असून या निवडणुकीत फॅसिस्ट शक्तीचा पराभव हे राष्ट्रीय हित असले पाहिजे, असे सावंत यांनी नमूद केले आहे. देशाच्या व्यापक हितासाठी मोदी-शहा या जोडीला पराभूत करा, असे आवाहन आपचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेले आहे याकडे सावंत यांनी लक्ष वेधले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने महाराष्ट्रातून ४८ उमेदवार उभे केले, पण यापैकी एकही उमेदवार विजयी झाला नाही. आपची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात आपच्या लोकप्रियतेचा आलेख राज्यात तळाला गेलेला आहे. यामुळे जेथे शक्ती आहे तेथेच लक्ष केंद्रित करणार आहे. आप या लोकसभा निवडणुकीत देशात काही जागांवर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र ....
अधिक वाचा