By SEJAL PURWAR | प्रकाशित: ऑगस्ट 31, 2019 11:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अनेक दिवसांपासून चालू असणार्या विधानसभा निवडणूकीच्या चर्चेमध्ये रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत, याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. परंतु आता शिवसेना नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार, अशी स्पष्ट घोषणा केलेली आहे असे सूत्रांकडून कळते. एवढेच नव्हे तर त्यांनी शिवसैनिकांना तयारीला सुद्धा लागायला सांगितले आहे, अशी माहिती मिळत आहे. वरळीतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचे समोर येत आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे वरळीतून 1 लाख मतांपेक्षा जास्त मत जिंकून आणतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेच्या इतिहासात आजतारखेपर्यंत ठाकरे कुटुंबाकडून कोणीही निवडणूक लढविली नाही, अनिल परब यांच्या घोषणेप्रमाणे आणि पक्षांतर्गत चाललेल्या चर्चेनुसार जर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे खरच वरळी विधानसभेतून निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहिले, तर शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या इतिहासातील ही एक ऐतिहासिक गोष्ट ठरेल. वरळी विधानसभा ही जरी मराठी बहुभाषिक म्हणजेच शिवसेनेचा हक्काचा मतदार संघ या वर्गवारीतला असला तरीही आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहत आसल्याने या विधानसभा निवडणुकीला एक वेगळे वलय प्राप्त होणार आहे व पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या आदित्य ठाकरेंना निवडून आणणे ही शिवसैनिकांसाठी मोठी कसरतीची गोष्ट असेल.
नुकतेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही राजकीय घराण्यातील युवा पिढीतील नवनेतृत्व पहिल्यांदा उभे राहिले, राजकीय पार्श्वभूमी व निवडणूकिंचा उत्तम अनुभव असूनही त्यांना लाजिरवाणी हार पत्करावी लागली, तर काही नेतृत्व विधानसभेच्या निवडणुकीत अजूनही स्वत:चे नशीब आजमावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. युवासेना प्रमुखांच्या नशिबाने शिवसेनेची मोठी ताकत या निवडणुकीत पणाला लागणार आहे. या संधीचा फायदा घेऊन आदित्य ठाकरे यांनी सोनं केलं तर काही बड्या घराण्यांच्या जुन्या व नव्या पिढीला चपराक लगावल्यासारखी असेल. तसेच त्यांना धडा घेण्यासारखी गोष्ट होईल.
अनंत चतुर्दशीनंतर विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आह....
अधिक वाचा