By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपूर - महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे सत्तास्थापन करण्याचे मनसुबे उधळून लावल्यानंतर राज्यात झालेल्या सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला धुळे वगळता अन्य पाच जिल्हा परिषदांमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. पालघर, नागपूर, नंदुरबार, वाशिम या चार जिल्हापरिषदांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे तर धुळ्यात भाजपने जिल्हा परिषदेवर विजय प्राप्त केला असून अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने सत्ता हस्तगत केली आहे.
नागपूरचा गडही भाजपाला राखता आला नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात चांगली पकड घेतल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. नागपूरमधील ५८ गटांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकला आहे.
तसेच आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार धुळ्यात ५६ जागांमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. तर पालघरमध्ये शिवसेना १८ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. नंदुरबार आणि वाशिममध्येही महाविकासआघाडी सत्तेवर आली आहे. तर अकोल्यामध्ये वंचित आघाडीने आपला गड राखला आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज'पूत्र' अमित ....
अधिक वाचा