By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 01:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसर्या दिवसीच मजबूत पकड मिळविली आहे. तिसर्या दिवशी दिवसअखेर भारताच्या 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीजची अवस्था 2 बाद 45 अशी झाली आहे.
पहिल्या डावात हनुमा विहारीच्या अर्धशतकामुळे हतबल झालेल्या विंडीज संघांचे कंबरडे जसप्रीत बूमराहने मोडले. त्याच्या हॅट्रिकमुळे हवालदिल झालेल्या विंडीजची दुसर्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवस अखेर 7 बाद 87 अशी दारुण अवस्था झाली होती. त्यानंतर रविवारी तिसर्या दिवशी भारताने विंडीजचा डाव 117 धावांत संपुष्टात आणून मोठी आघाडी घेतली. बूमराह भारताकडून हॅट्रिक करणारा तिसरा गोलंदाज ठरला. त्यानंतर भारताच्या दुसर्या डावाची सुरवात खराब झाली. पहिल्या डावात अर्धशतक फटकावणारा मयांक अगरवाल अवघ्या 4 धावांवर रौचच्या गोलंदाजीवर बाद झाला. राहुलही रौचचाच शिकार ठरला. कर्णधार कोहलीला भोपळाही फोडता आला नाही, त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 36 अशी झाली. अखेर अजिंक्य रहाणे आणि हनुमा यांनी अर्धशतकी खेळी करीत भारताला दीडशेच्या पार नेले. विहारीचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर कर्णधार कोहलीने 4 बाद 168 वर डाव घोषित केला आणि विंडीजसमोर 468 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानापुढे विंडीजची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरली. ब्रेथवेटला ईशांतने अवघ्या 3 धावांवर बाद केले. तर शर्माने कॅम्पबेलला 16 धावांवर बाद करीत विंडीजला दूसरा धक्का दिला. तिसर्या दिवस अखेर डॅरेन ब्राव्हो 18 आणि ब्रुक्स 4 धावांवर खेळत होते.
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक पटकावल्य....
अधिक वाचा