By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 06:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
कोलकाता - इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या 12 व्या सीझनसाठी येत्या 19 डिसेंबर रोजी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव पहिल्यांदाच कोलकातामध्ये होणार आहे. यापूर्वी हा लिलाव बंगळुरु येथे केला जात होता. यावेळी लिलावामध्ये एकूण 332 खेळाडूंना निवडण्यात आले आहे. यामध्ये 186 भारतीय तर 143 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
यंदाच्या लिलावात आठ फ्रँचाईजीकडून बाकी असलेल्या 73 जागांसाठी लिलाव होणार आहे. आयपीएल 2020 साठी 997 खेळाडूंनी आपली नावं रजिस्टर केली होती. यंदाच्या लिलावात सर्वाधिक महागड्या खेळाडूची किंमत 2 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये सात परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 2 कोटी रुपयांच्या किंमतीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या सात जणांमध्ये पॅट कमिंस, जोश हेजलवूड, क्रिस लिन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेल स्टेन आणि अँजेलो मॅथ्यूज यांचा समावेश आहे.
या सीझनमध्ये भारतातील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून रॉबिन उथ्थप्पाचे नाव समोर येत आहे. रॉबिन उथ्थप्पाला 1.5 कोटीमध्ये खरेदी करण्यात आले आहे. उथ्थप्पानंतर सर्वात महागडे खेळाडू म्हणून पीयूष चावला, युसूफ पठाण आणि जयदेव उनाडकटच्या नावाचा समावेश आहे. या तिघांना एक कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फल....
अधिक वाचा