By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
टोकियो येथे पुढच्या वर्षी म्हणजेच 24 जुलै ते 9 ऑगस्ट 2020 दरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्वतयारीकरिता 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी शेलार यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील खेळाडूंना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली.
महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जाधव या दोनच खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. राहीने पिस्तल नेमबाजीत तर प्रविणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या दोघांनाच ऑलिम्पिकमध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे.
कर्णधार विराट कोहलीचे दमडार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्य....
अधिक वाचा